Description
‘‘मी अग्निशिखा आहे. मला बळी हवाय; अश्वत्थामाचा! तो ब्राह्मण असला तरी! त्याच्या ब्राह्मण्यत्वाला काळिमा फासलाय त्याने! अती शूद्र,अती हीन झालाय तो! तो जगायच्या लायकीचा नाही. त्याला पुरुषार्थाचं मरण द्यायचं नाहीतर छळूनछळून मारायला हवं. त्याला जाणवायला हवं की माझ्या पुत्रांना मारून त्याने घोर अपराध केलेला आहे. त्या नीचाच्या डोक्यावरचा मांसल मणी कापून मला आणून द्या.’’ एवढा क्रोध तिचाच असू शकतो! अग्निसारख्या तेजस्वी आणि कृष्णाची सखी असलेल्या नील वर्णाच्या नीलागिनीचा!
Reviews
There are no reviews yet.