Description
जगात दुस-या महायुद्धाचा वणवा पेटलेला… जपाननं सिंगापूरमधली ब्रिटिशांची सत्ता उलथवून तिथे आपले हातपाय पसरलेले… परंतु अल्पावधीतच जपानी साम्राज्याच्या सत्तेचा हा सूर्य ढळू लागला. सिंगापूरमधले सारे जपानी पराजयाच्या कल्पनेनं, त्यानंतर उसळणा-या सुडाग्नीच्या दहशतीनं प्रचंड हादरले! जीव वाचवण्यासाठी, जपानला पळण्यासाठी जिवाचा आटापिटा करू लागले. जपाननं सिंगापूरमधल्या जपानी नागरिकांना परत आणण्यासाठी ‘आवा मारू’ नावाची बोट पाठवली. या बोटीला अमेरिकेकडून सुरक्षित प्रवासाची हमी मिळालेली होती. परंतु एकच बोट आणि जपानी असंख्य! बोटीत जागा मिळवण्यासाठी सारे जिवाच्या आकांतानं धडपडू लागले. अखेर, दोन हजार ‘निवडक भाग्यवंतां’ना घेऊन बोटीनं २८ मार्च १९४५ या दिवशी सिंगापूर सोडलं. परंतु १ एप्रिलच्या त्या भयाण रात्री काही वेगळंच घडलं!… कुठे गेले हे सारे लोक?… तीन दशकांनंतर क्योको तानाका झपाटल्यासारखी कुठे गेली? कुठे गुंतले होते तिच्या आयुष्याचे अदृश्य धागे?… आजवर साहित्यकृतीत शब्दबद्ध न झालेली दुस-या महायुद्धाच्या काळातली ही सत्य घटना आणि काळजाचा थरकाप उडवणारे त्यातले तपशील वाचकांनीही अनुभवावेत… रेई किमुरांनी ‘आवा मारू’ या बोटीच्या वास्तव घटनेभोवती इतक्या कसबीपणानं कल्पित कथानकाचा एक दुपेडी गोफ विणला आहे, की ती घट्ट वीण वाचकालाही त्यात ओढून घेते. अतिशय उत्कंठावर्धक रहस्यमयतेनं गतिमान होत जाणारं हे लेखन, पुस्तक वाचून संपवलं तरी वाचकाला पकडून ठेवतं!
Reviews
There are no reviews yet.