Description
जर मी परत आलो नाही तर… युरेका! ४० १० ४ ४०० ३० ९ ३० ७० १०० ५ २०० ३० १० ४० १ ८० ५ १०० ४०० ४० १० ५० १० २०० ३०० १०० ८ ७० ९ १ ५० ३०० १० २० ८०० १० ३०० १० २०० ००५११७२५४३६७२ ऑक्सफोर्ड विद्यापीठातील एका नामवंत प्राध्यापकाचा खून झाला आहे पण ही आत्महत्या आहे असं तपास अधिकारी सांगताहेत. तपास अधिका-यांच्या या म्हणण्यावर – विशेषत: मृत्यूने गाठण्याआधीच्या काही तासांदरम्यान प्राध्यापकांनी सांकेतिक भाषेत तिला पाठवलेला संदेश आणि अतिप्राचीन काळातले काही अत्यंत मौल्यवान नकाशे मिळाल्यानंतर – सुंदर, तरुण आणि विद्वान प्राध्यापिका कॅथरीन डोनोव्हान अजिबात विश्वास ठेवायला तयार नाही. पौराणिक वाङ्मय-विषयात तज्ज्ञ असलेल्या प्राध्यापक जेम्स रुदरफोर्डच्या साथीने सुरू झालेला हा सत्यशोध त्यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठ नावाच्या स्वप्ननगरीतून खेचून नेत पेरू आणि इजिप्तमधल्या ऐतिहासिक, प्राचीन वास्तूंची सफर घडवतो. त्यांचा हा शोध-प्रवास पूर्णत्वास जाऊ न देण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असलेल्या एका महाभयंकर, दुष्ट यंत्रणेच्या मारेक-यांनी त्यांना गाठून त्यांची शिकार करण्यापूर्वी आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेले ते रहस्य उलगडण्यात कॅथरीन आणि जेम्स यशस्वी होतील का? त्या दोघांच्या जिवाला निर्माण झालेल्या धोक्यापेक्षाही – संपूर्ण जगावरच कोसळण्याची शक्यता असलेल्या प्रलयंकारी निसर्गापत्तीबद्दलचे – त्या सांकेतिक संदेशातून देण्यात आलेले धोक्याचे इशारे खरे असतील का?
Reviews
There are no reviews yet.