Description
“गुरुजी, लौकिक जीवनात अशांतता… पारलौकिक जीवनाच्या अस्तित्वाविषयी खात्री नाही. कुणी तरी सांगतंय म्हणून विश्वास ठेवण्याइतका अडाणीपणा नाही. जगण्या-मरण्यातली गूढता उकललेली नाही. परंपरेनं सांगितलेल्या गोष्टींवर निश्चित विश्वास नाही. या विचारांनी गांगरून, गोंधळून गेले आहेत सारे. निश्चित मार्ग दिसत नाही; असलेल्या मार्गांनी केलेली निराशा लपत नाही. संधिकालाची अवस्था आहे गुरुजी… संक्रमणकाळी साऱ्या विचारप्रणाली निर्णायक उत्तर देण्यात असमर्थ ठरल्या आहेत. समष्टीला त्यांची खात्री नाही; पण समोर दुसरा मार्गही दिसत नाही. काळाच्या विचित्र धारेवरून प्रवास सुरू आहे. आता निश्चितता हवी आहे. गूढता संपायला हवीय. सगळे अर्थ स्पष्ट व्हायला हवेत. स्थिरता हवी.“ श्रीराम बोलायचा थांबला.
Reviews
There are no reviews yet.