Description
अंतराळ शास्त्रासोबत किरण, भौतिकशास्त्र, अणुशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पती शास्त्रांसारखे विषय या कथांमध्ये हाताळले आहेत. ‘प्रतिशोध’ ही कथा एका थरारक अनुभवातून भविष्यात बिकट होणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न सोडविणारी आहे. तर ‘अंतराळातील मृत्यू’, ‘प्रतिघटना’, ‘अद्भुत प्रवास’ ह्या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रति पृथ्वीचा व समांतर विश्वाच्या शोधाच्या कथा आहेत. ‘प्रगाढ’ ही कथा किरण शास्त्रावर आधारित असून त्यातील शास्त्रज्ञ सुडापोटी विघातक प्रयोग करतो आणि समाजापुढे प्रश्न निर्माण करतो. ‘प्रगल्भ’ ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदूचा दर्जा मिळून देताना, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना? याची दखल घेते. शिवाय मानवसुध्दा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकतो हे ‘आविष्कार’ या कथेत प्रकर्षाने जाणवते. ‘अंधारातील तीर’ ही कथा मात्र शास्त्रज्ञाचा नकारात्मक दृष्टिकोन निसर्गालाच कसे वेठीस धरू शकतो याची जाणीव करून देते.
Reviews
There are no reviews yet.