Description
ग्रामीण कथा-कादंबरीकार श्री. महादेव मोरे यांनी रेखाटलेल्या काही व्यक्तिचित्रांचा हा संग्रह. ही बहुतांशी समाजातील तळागाळाच्या वर्गातल्या, नगण्य ठरवणाऱ्या, परंतु वैशिष्ट्यपूर्ण अशा व्यक्तींची शब्दचित्रं आहेत. लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीनं, जगाला दिसणाNया यांच्या चेहऱ्यामागील चेहऱ्यांच दर्शन यात घडवलं आहे. मोजक्या घटना-प्रसंगांच्या व व्यक्तिनुरूप भाषिक अभिव्यक्तीच्या फटकाऱ्यांनी रेखाटलेली ही व्यक्तिचित्रं वाचकाच्या मनाचा ठाव घेतात. यात जसं माणसांचं दु:ख, वेदना, त्यांची जगण्याची धडपड, परिस्थितीनं होणारी होरपळ यांच्या विविध छटांचं दर्शन घडतं, तसाच माणसांचा बेरकीपणा, इरसालपणा, परिस्थितीपोटी आलेला खोटेपणा यांचाही प्रत्यय येतो.लेखकाच्या, सहानुभूतिपूर्ण दृष्टिकोणामुळे, पुस्तक वाचून संपलं, तरी ही माणसं वाचकाच्या मनात रेंगाळत राहतात….
Reviews
There are no reviews yet.