Description
ऐतिहासिक काळापासून अनेक सूक्ष्मजीवांनी मानवजातीला नष्टतेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवल्याची उदाहरणे आहेत. जगभरात वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या साथींच्या आणि माणसांनं त्याविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या मन विषण्ण करणाऱ्या कहाण्या आहेत. त्यातून जगभरातल्या वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि सामान्य माणसांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे अनेक आशेची किरणं दिसत आहेत. कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे या विषयाची पुन्हा उजळणी करणं गरजेचं बनलं आहे. या विषयाला रोगाचा आणि औषधाचा वास असला तरी, आजच्या काळात हे बाळकडू देणं गरजेचं वाटल्यामुळे डाॅ. अनिल गांधी आणि अमृता देशपांडे यांनी या पुस्तकात या विषयाला हात घातलेला आहे. सोबतच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.हमीद दाभोळकर, पर्यावरण वरण अभ्यासक डाॅ. रविंद्र व्होरा यांच्यासारख्या मान्यवरांनी या विषयाचा विविधांगी आढावा घेतला आहे.
Reviews
There are no reviews yet.