Description
“ये, शून्य-शून्य-सात,“ एम. म्हणाला. “तू परत आलेले बघून खूप बरे वाटले.“ “मला गरज आहे तुझी शून्य-शून्य-सात. नीटशी माहिती नाही; पण फारच मोठी भानगड निर्माण होणार आहे असे वाटते. तू डॉ. ज्यूलिअस गॉर्नर हे नाव कधी ऐकले आहेस?“ ज्यूलिअस गॉर्नर – ग्रेट ब्रिटन धुळीला मिळवण्याच्या एकाच आसुरी इच्छेने पछाडलेल्या या माणसाचे नाव तर बाँडच्या मनावर कोरले गेले होते. पॅरिस शहराबाहेर भीषण पद्धतीने दिलेला देहदंड, साठच्या दशकामध्ये ब्रिटनमधल्या तरुणांमध्ये जाणून-बुजून केला जाणारा मादक द्रव्यांचा अफाट प्रसार, इराकवरून उड्डाण करत असताना नाहीसे झालेले ब्रिटिश एअरलायनर यांसारख्या वेगवेगळ्या घटनांनी मध्यपूर्वेच्या आसपास युद्धाचे पडघम वाजायला लागले आणि पुन्हा एकदा संपूर्ण जग महाभयंकर विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची लक्षणे दिसू लागली…. आणि मग पॅरिस येथल्या स्कार्लेट पापावा या सुंदर तरुणीकडून मिळणा-या मदतीची बाँडला गरज भासते; कारण डॉ. गॉर्नर हा सैतानाबरोबरही हात मिळवण्याची तयारी असलेला तसाच खतरनाक शत्रू असतो. जेम्स बाँडची नवीन, मनोवेधक कथा!
Reviews
There are no reviews yet.