Description
“ख्रिसमसनिमित्त केलेली शहरातील रोषणाई पाहण्यासाठी फॅशन जर्नालिस्ट लॉरेन ऊर्फ लोलो त्या लहानशा विमानात फेरफटका मारण्यासाठी बसली खरी; पण ती रात्र तिच्यासाठी काळरात्रच ठरली. कारण विमानातून उतरताना विमानाच्या प्रोपेलरच्या फिरणाऱ्या पात्यांमध्ये येऊन तिचा भयंकर अपघात झाला. आपल्या प्राणांसाठी झगडणाऱ्या जखमी लॉरेनला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेत होते, तेव्हा जणू सगळं जगच धक्का बसल्याप्रमाणे स्तिमित होऊन पाहत होतं. कित्येक मोठ्या शस्त्रक्रियांनंतर आणि हजारो जणांच्या प्रार्थनांनंतर लोलो जिवंत राहिली. पण तिच्या मेंदूला जबर मार बसला होता आणि या अपघातात तिनं आपला डावा हात आणि डोळा गमावला होता. जिथं बाह्य सौंदर्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं, अशा फॅशनच्या क्षेत्रातच काम करणाऱ्या सुंदर लॉरेनचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं, असं अनेकांना वाटलं होतं. पण ते चूक होतं ! ‘स्टिल लोलो’ या पुस्तकात लॉरेन आपल्याला सांगते की, त्या रात्री नेमकं काय घडलं, या भयंकर अपघातातून ती कशी वाचली आणि बाहेर आली, आणि आज तिचं आयुष्य कसं आहे… तिच्यासमोर उभ्या असलेल्या अत्यंत अवघड प्रश्नांचीही ती न डगमगता, प्रामाणिकपणे उत्तरं शोधायचा प्रयत्न करते- माझं आता भवितव्य काय? या प्रकारानंतर कोणी माझ्यावर प्रेम करेल की नाही? या सगळ्या वेदनादायी प्रवासात देव कुठं आहे? भयविरहित जीवन कसं जगावं, आणि आयुष्यात कोणतीही संकटं, आव्हानं समोर आली तरी त्यावर कशी मात करायची, हे तिच्या जीवनकहाणीतून लॉरेन आपल्याला सांगते. लॉरेन आणि तिच्या कुटुंबाची ही सुंदर कहाणी- ‘स्टिल लोलो’ आपल्याला बरंच काही सांगून जाते- श्रद्धा, जिद्द, चिकाटी आणि काहीही झालं तरी आपलं स्वत्व जपण्याची आस ! “
Reviews
There are no reviews yet.