Description
मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची कहाणी. `फरासि प्रेमिक` ही कथा आहे, नीलांजना मंडल या बंगाली तरुणीची. उपाहारगृहमालक असणाऱ्या किसनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोनेरी पिंजऱ्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशाआकांक्षा पूर्ण होणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण आणि शयनेषु रंभा… एवढंच तिचं स्थान पाहून तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत निघालेल्या आयुष्यातून कुठं मोरपिशी वाट फुटतेय का? यासाठी नीला आतुर असते आणि अशा वेळी तिच्या आयुष्यात येतो बेनॉयार ड्यूपॉट… गोरापान, निळ्याशार डोळ्यांच्या राजबिंडा फ्रेंच तरुण, नीला त्याच्याप्रेमात आकंठ बुडते. बेनॉयर तिची पेरिसमधल्या रस्त्यांशी, कॅफेजशी, कलादालनांशी ओळख करून देतो… नीलासमोर जणू सर्वस्वी नवं विश्व खुलं होतं. बेनॉयरशी तिचे अगदी उत्कट शारीरिक, भावबंध जुळलेले असतात… हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशाआकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. अखेर बेनॉयरचं प्रथम प्राधान्य स्वत:ला आहे, त्याचं फक्त स्वत:वर प्रेम आहे… आपल्या प्रियतमेवर नाही, हे उमगल्यावर त्यांच्या संबंधांना पूर्णविराम मिळतो, पण तिच्या आत्मशोधाच्या मार्गाचा आत्ता तर कुठे प्रारंभ झालेला असतो… धाडसी संकल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडलेली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एका स्त्रीच्या मनोवास्थेचं वेधक चित्रण या कादंबरीत आहे.
Reviews
There are no reviews yet.