Description
प्रथम ते नाट्य हजारो फूट उंच हवेत सुरू झाले. नंतर हा हवेतला रंगमंच जमिनीवर आला, समुद्रात गेला व अखेर समुद्रतळावर पोचला. त्या समुद्रतळावरील रंगमंचावरती शेवटी रोमहर्षक नाट्याने कळस गाठला. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती, गुन्हेगार व एक झपाटलेला माणूस. यात घडणारे हे नाट्य आजवर मराठी माणसाने कधी कल्पनेतही आणले नसेल. ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन्स’चा कादंबरीकार अॅलिस्टर मॅक्लीन याच्या ‘फिअर इज द की’ या जगभर गाजलेल्या कादंबरीचा अनुवाद मराठीत प्रथमच श्री. अशोक पाध्ये यांनी त्यांच्या खिळवून टाकणा-या शैलीत केला आहे. एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसNया कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखविणारी कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.