Description
राष्ट्रीय स्तरावर ‘बेस्टसेलर’ ठरलेली हलकीफुलकी कादंबरी. तुम्हाला या पुस्तकात आयआयटी या भव्यदिव्य स्वप्नाची पूर्ती कशी करावी किंवा तिथे कसा प्रवेश मिळवावा किंवा तिथे कसं तरून जावं याचं मार्गदर्शन मिळणार नाही, पण जर तुमची विचारसरणी ‘सरळ’ नसेल तर तिथं काय घडू शकेल, ते मात्र नक्की समजेल! अतिशय तरल विनोदाचा शिडकावा करतानाच अनेक सूक्ष्म गोष्टींवर नेमकं बोट ठेवणा-या ओघवत्या कथनशैलीतील वाचनीय कादंबरी. आयआयटी कॅम्पस व कॉलेज-जीवनाची पाश्र्वभूमी लाभलेली ही कादंबरी तीन मित्रांची कथा सांगतानाच आजूबाजूच्या अनेक गोष्टींवर भाष्य करत वाचकाला खिळवून ठेवते आणि एका आगळ्या विश्वाचं भावपूर्ण दर्शन घडवते, ते सुद्धा हलक्याफुलक्या शैलीत.
Reviews
There are no reviews yet.