Description
पर्ल हार्बरच्या हल्ल्यात यशस्वी झालेल्या जपानी राष्ट्राची आगेकूच…. दुस-या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून मार खाणारे जपानी राष्ट्र पार खिळखिळे झाले होते. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन सतरा-अठरा वर्षांची पोरंही युद्धात सैनिक म्हणून भरती होतात. मुली नर्स आणि इतर कामे करतात. सायुरी मियामोटो अशीच एक तरुणी. टोकियोला नर्स म्हणून काम करत असताना ती आपली मैत्रिण रैकोच्या वाग्दत वराचा मृत्यू पाहते. युद्धात तिचा भाऊ बोटीवर आणि मैत्रीण रैको बॉम्बहल्ल्यात मरण पावते. ह्या सर्वांचा सूड घ्यायचा म्हणून ती ‘कामिकाझी’ पायलट बनते, तेही पुरूष वेषांतर करून. पुरुषांच्या बरोबर राहणे, जगणे, प्रशिक्षण घेणे ह्यात हे वेषांतर उघड होते, तेही तिचा प्रशिक्षक आणि प्रियकर असणा-या ताकुशीकडे. ह्यात पुरुषांचे वेषांतर करून लष्करात घुसलेली ही स्त्री. ह्या गुन्ह्यांची तिला काय शिक्षा मिळते?…. ही कहाणी तशी अद्भूत, विलक्षणच….
Reviews
There are no reviews yet.