Description
‘‘अजूनही तुमच्या अंगात शिकारीचा अनुभव भिनलेला नाही! त्यातही तुम्ही शिकार खेळलात ती कुठं? राग अनावर झाल्यावर उगाच एकदोन खून केले असतील तुम्ही! एखाद्या प्राण्याचा पाठलाग केलाय का कधी? तो कधीच आपल्या हद्दीबाहेर जात नाही. जीव वाचवण्यासाठी जी काही धडपड करायची ती त्या परिघातच करतो आणि आहुती देतो. माझंही तसंच आहे. एवढा वेळ तुम्ही माझ्याशी गोड बोलताय! मी पळून जायला लागल्यावर पाठीमागून गोळी घालणार नाही, कशावरून? आपल्या फिल्डमध्ये एकाच गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो. ती म्हणजे, कधीही कुणावरही संपूर्ण विश्वास ठेवायचा नाही!“ `अंडरवल्र्ड’ मधल्या भिन्न पातळीवर वावरणाया माणसांमधले विलक्षण नातेसंबंध दाखवणारी आगळीवेगळी कलाकृती!
Reviews
There are no reviews yet.