Description
सत्य घटनांबद्दल लिहिताना डॉ. अतुल गवांदे आपल्या मनाची अशी काही पकड घेतात की वाटते, वैद्यकशास्त्रविषयाची माहिती मिळवण्यासाठी ते त्याचीच चिरफाड करत आहेत. खरं पाहता, सर्वसामान्यांच्या मनात या शास्त्राविषयी एक प्रकारची उदात्ततेची भावना असते. गवांदे मात्र आपल्यासमोर वास्तव ठेवतात, ते त्याच्या मूळ स्वरूपात. हे वास्तव अत्यंत गुंतागुंतीचे असते, गोंधळात टाकणारे असते आणि कमालीचे मानवी असते. ज्या वेळी हे शास्त्र संदिग्ध स्वरूपाचे असते, उपलब्ध माहिती अगदी मर्यादित असते, जोखमीचे प्रमाण मोठे असते अन् तरीही निर्णय घेणे अपरिहार्य होऊन बसते, तेव्हा गवांदे आपल्यापुढे सगळी परिाQस्थती उघडपणे मांडतात, कसलीही लपवा-छपवी करत नाहीत. रुग्णांच्याच नव्हेत; तर डॉक्टरांच्या नाट्यपूर्ण कथाही ते आपल्याला सांगतात तेव्हा त्यामागचा हेतू सत्यशोधनाचा आहे, असे जाणवते. डॉक्टरांच्या हातून घडणाNया चुकांमागची कारणे ते आपल्याला प्रामाणिकपणे सांगतात, चांगल्या शल्यविशारदांना रसातळाला नेण्यामागील कारणांची ते शहानिशा करतात, अनाकलनीय असे वास्तव समोर ठाकल्यानंतर वैद्यकीयशास्त्र त्याला कशा प्रकारे तोंड देते, हे प्रश्न सामान्य वाचकांना गवांदे यांनी सांगितल्यामुळेच कळतात, असे म्हणता येईल. ‘कॉम्प्लीकेशन्स’ हे पुस्तक वाचताना एका बाजूला अतिशय कणखर मनोवृत्तीचे दर्शन घडते, तर दुस-या बाजूला मानवतेचा ओलावाही जाणवतो. वैद्यकीय विषयावरील हे पुस्तक एका वेगळ्याच पठडीतले आहे, असेही मनात येते.
Reviews
There are no reviews yet.