Description
पर्ल बक यांच्या ` द गुड अर्थ ` या जगप्रसिद्ध कादंबरीचा अनुवाद म्हणजेच भारती पांडे यांनी अनुवादित केलेली काली हि कादंबरी होय. ज्या व्यक्तीला वाचता येते तिने हे पुस्तक वाचुन स्वत:मध्ये मुरवून घेतले पाहिजे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये असे धडे घेण्याच्या वेळ केव्हा न केव्हा आलेली असते,असा अभिप्राय या कादंबरीबद्दल मास-मार्केट-पेपर बॅक मध्ये नोंदविण्यात आलेला आहे. वांगलूग आणि त्याच्या कुटूंबाच्या जीवन प्रवासामध्ये सहभागी होऊन जाता यावे, अशा प्रकारचे संवादी लेखन या कांदबरीचे आहे.वांगलूग हा चिनी शेतकरी या कादंबरीचा नायक आहे. त्याच्या लग्नाच्या दिवसापासून या कादंबरीला सुरुवात होते आणि या जीवन प्रवासात प्रौढ झालेली त्याची सुशिक्षित आणि शहरी मुले त्याच्या मरणाची वाट पाहतात.
Reviews
There are no reviews yet.