Description
विभिन्न जगात, विभिन्न परिस्थितीत जन्म घेतलेली दोन अपरिचित माणसं…. विल्यम लोवेल केन आणि एबल रोस्नोव्हस्की. पहिला बॉस्टन शहरातल्या एका धनिकाचा मुलगा, तर दुसरा अमेरिकेत नशीब काढण्यासाठी दाखल झालेला निष्कांचन पोलिश निर्वासित. दोघांचा जन्म एकाच दिवशी, एकाच वेळी पृथ्वीच्या दोन विरुद्ध बाजूंना झालेला असतो. दोघंही महत्त्वाकांक्षी, बलशाली, निर्दय असतात; आपापल्या स्वप्नपूर्तीसाठी लढा देत असतात. दोघांनाही स्वत:चं अनिर्बंध साम्राज्य उभं करायचं असतं. नियती या दोघांना एकत्र आणते आणि दोघं एका संघर्षाच्या आवर्तात सापडतात…. युद्ध, विवाह, संपत्ती, यश आणि दुर्दैव या सर्वांतून मार्ग काढत-काढत केन आणि एबल यांची विजयप्राप्तीसाठी झुंज चालू राहते; पण विजय मात्र एकालाच मिळणार असतो….
Reviews
There are no reviews yet.