Description
जन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या ‘मॅनहटन’ या रम्य बेटावर माझा जन्म झाला. ‘मॅनहटन’ म्हणजे एक लहानसे जगच होते. अशा या जगात मी जन्माला आलो आणि अगदी सुरुवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला. कळू लागल्यापासून मला वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावचा आहे. …आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला कधी काही वाटले नाही. मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे, पाहिजे त्याची चौकशी करावी. अर्थात नाकळता होतो तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो; पण लवकरच मी कळता झालो. धीट झालो आणि न्यूयॉर्कची गल्लीन्गल्ली पालथी घातली.
Reviews
There are no reviews yet.