Description
‘मला आता स्वतःची ओळख करून द्यायला हवी. मी अबीर गांगुली. मुंबईतल्या ‘द आफ्टरनून मेल’ या टॅब्लॉईडसाठी काम करतो. वय २३. कुठलीही गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून सांगायची मला सवय आहे.’ एका रात्री क्राईम रिपोर्टर अबीर गांगुलीला पोलीस अटकेची बातमी कव्हर करण्यासाठी बोलावतात. गोळी झाडली जाते आणि एक माणूस त्यात मरतो. पोलीस दबाव आणतात का? अबीरच्या बॉसला त्या गुन्ह्याच्या वेळी तो तिथेच असल्याचे माहीत नसते. तो त्याला बळी पडलेल्या माणसावर स्टोरी करायला सांगतो. त्यासाठी त्याला मुनीझा ऊर्फ सान्चोला भेटायलाच लागणार असते, कारण ती त्या बळी गेलेल्या माणसाची एकुलती एक मुलगी असते. काही दिवसांनंतर त्या बडबड्या रिपोर्टरची आणि बसमधून प्रवास करणाऱ्या त्या साध्यासुध्या मुलीची ओढूनताणून मैत्री होते. ज्या गोष्टींमुळे त्यांची मैत्री झालेली असते, त्यांचे पुढे काय होते? अबीरच्या फ्लॅटमधल्या मत्सरी पालीची मन:स्थिती बदलते का?
Reviews
There are no reviews yet.