Description
`नटरंग` मराठीतील एक अव्वल दर्जाची, कलात्म आणि शोकात्म कादंबरी. `नटरंग` मध्ये आनंद यादवांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाची बहुतेक सारी वैशिष्ट्ये प्रभावीपणे व्यक्त झालेली आहेत. प्रसंगांना चित्रवत आकार देण्याची आणि संपूर्ण रसपूर्ण बनवण्याची, त्यांना मनोवैज्ञानिक स्पर्श देण्याची, प्रसंगातील कारुण्य आणि विनोद हेरण्याची लेखकाची क्षमता विलक्षण आहे. त्यामुळे कादंबरीचे वातावरण चैतन्यपूर्ण झाले आहे. `नटरंग` ही एका भारतीय कलावंताची शोकांतिका. तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत. जीवनातील भयानक दारिद्र्य आणि कलात्मक ऊर्जा, कलावंताचे कुटुंब आणि कलावंताचे कलाव्यक्तिमत्त्व, मातंग समाजाची रूढिग्रस्त जनमान्य जीवनशैली आणि तिच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने आणि कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणारा कलावंत, कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी करू पाहणारे सहकारी आणि कलेच्या विशुद्धतेचा ध्यास घेऊ पाहणारा कलावंत, अशी संघर्षाची विविध आणि व्यामिश्र रूपे `नटरंग`मध्ये एकजीव झालेली आहेत. डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर
Reviews
There are no reviews yet.