Description
निश्चल उभा हिमालयही असतो. हे सुख-दु:ख अंगावर चालून येतं. वादळासारखं! व्यक्तिमत्त्वाच्या चिंध्या करत, पण एक लक्षात ठेव प्रणव, समुद्री वादळात जेव्हा जहाज अडकतं आणि कॅप्टन गोंधळतो, तेव्हा त्याला `आय ऑफ स्टॉर्म’ दाखवला जातो. त्या वादळाचा मध्यिंबदू म्हण. त्या मध्यिंबदूत नीरव शांतता असते. अगदी आश्चर्यकारकरित्या. जहाजाला त्या `आय ऑफ स्टॉर्म’मध्ये नेलं की जहाज सुरक्षित राहातं. तसंच अंतर्मनात एक कोपरा एवढा निश्चल, निवांत निर्माण करावा लागतो की आयुष्यात कितीही वादळं आली तरी त्या क्षणी मनाला त्या कोप-याचा आसरा घेता यायला हवा. असा कोपरा प्रयत्नानंच निर्माण करता येतो. स्वत:ला विसरून, विखरून, ध्यानात किंवा एखाद्या कामात. हे जीवनाचं रूप आहे.
Reviews
There are no reviews yet.