Description
१९३९ ते १९४५ एका विकृत राजवटीच्या हट्टापायी सगळं जग वेठीला धरलं गेलं होतं. युरोपची भूमी बेचिराख होत होती.ज्यूंचा वंश नष्ट करायची प्रतिज्ञा नाझी भस्मासुराने केली होती.त्या आगीत सगळ्यात जास्त होरपळून निघालेला देश म्हणजे पोलंड. नाझींनी उघडलेल्या ३२० छळछावण्यांपैकी ३०० पोलंडमध्ये होत्या.त्या सगळ्या देशाचाच तुरुंग झाला होता. या दुस-या महायुद्धाच्या कालखंडात माणसामधल्या सैतानी वृत्तीने कळस गाठला होता. पण त्याच बरोबर खूप ठिकाणी देव, माणसांच्या रूपात संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जात होता.शिंडलर्स लिस्ट ही अशाच एका देवमाणसाची कथा आहे, ज्यानं स्वत: जर्मन असून, स्वत:चं सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. लिओपोल्ड पेफरबर्ग हा ऑस्कर शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंपैकी एक. ही जगावेगळी कथा लोकांसमोर आणण्यासाठी त्यानं अतोनात कष्ट केले. थॉमस केनेलीसारख्या सिद्धहस्त प्रतिभावंताने ही कथा १९८३ साली लिहिली.जगभरात तिला प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासकट अनेक मानसन्मान लाभले.विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या ऑस्कर शिंडलरचं नाव या कलाकृतीमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात चिरंतन झालं.
Reviews
There are no reviews yet.