Description
ग्रेग मॉर्टेन्सन यांची ‘सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट’ ही सेवाभावी संस्था गेली सोळा वर्षं पाकिस्तानातील व अफगाणिस्तानातील दुर्गम, उपेक्षित कोपऱ्यांमध्ये शाळा बांधून देऊन मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य करीत आहे. या देशांमधील दहशतवाद्यांच्या बंडखोरीला शह देऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी ‘शिक्षण’ – विशेषत: स्त्रीशिक्षण – ही गुरुकिल्ली आहे, असा या संस्थेचा ठाम विश्वास आहे. अमेरिकन देणगीदारांनी सढळ हाताने दिलेल्या देणग्यांचा या सत्कार्यासाठी विनियोग करताना या संस्थेने विविध प्रकल्पांच्या जागेवरील स्थानिक लोकांशी विश्वास व आदरावर उभारलेले जिव्हाळ्याचे नातंसुद्धा जोडले आहे. उमद्या वृत्तीने, चिकाटीने व विनयशीलतेने केलेल्या या कार्याचा मनमोहक आलेख म्हणजेच हे पुस्तक! प्रचंड अस्थिरता व हिंसाचारांनी बुजबुजलेल्या देशात जिवावर उदार होऊन या सत्कार्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांची ही हृद्य, प्रेरणादायी व थरारक कहाणी मानवी मनाच्या थोरवीचे विविध पैलू दाखवून वाचकाला स्तिमित करते.
Reviews
There are no reviews yet.