Description
माणसामाणसांतील संबंध कसे सुधारावेत, हे सांगणारं पुस्तक आहे ‘द माइंड जिम रिलेशनशिप्स.’ या पुस्तकात एकूण चार विभाग आहेत. ते चार विभाग आणि त्यात चर्चेसाठी घेतलेले मुद्दे असे आहेत – संबंध जुळलेले – या विभागात योग्य मन, तुमची नाडी तपासा, शांत राहणं, संकोचणारा ते चमकणारा. एकत्र येणं – आपण ऐकता का?, आनंदी शाळा, लक्ष द्या, माझ्यावर विश्वास ठेवा. कठीण हे प्रेम! -फाइट क्लब, विष काढा, व्यवहार किंवा व्यवहार नाही, त्रास असल्याचा संशय, कठीण शब्द. त्वेगळ्या पद्धतीचे संबंध – चाकोरीबाहेर, कठोर बोलणं, तापदायक माणसं, सन्माननीय सुटका. तसेच या पुस्तकात काही कार्यक्रम आणि ‘ऑनलाइन माइंड जिम’ या संकल्पनेचा अंतर्भाव आहे. संबंध सुधारण्याचं सखोल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.
Reviews
There are no reviews yet.