Description
पुस्तकाचा लेखक सुदान देशातील डारफर प्रांताचा रहिवासी आहे. वंशाने तो ‘झॅघावा’ आहे. ‘झॅघावा’ ही डारफर मधील भटकी जमात. अरब आणि आफ्रिकन या दोन्ही वंशाचे लोक डारफर मध्ये गेली हजारो वर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण गेली काही वर्षे डारफर प्रांतात भयंकर वंशविच्छेद सुरू आहे. वंशाने स्वत:ला ‘उच्च’ समजणाऱ्या अरब वंशीयांना त्यांचे मूळ आफ्रिकन बांधव नकोसे झाले आहेत. सत्ताधारी अरब आणि त्यांना पाठिंबा देणारे माथेफिरू; हे मूळ आफ्रिकन वंशीयांना त्यांच्याच भूमीतून हाकलून देत आहेत. मूळ रहिवाश्यांच्या गावांवर आणि वस्त्यांवर हल्ले करून त्यांना जिवे मारण्यात येत आहे. स्त्रियांवर आणि कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत. लाखो विस्थापितांचे लोंढेच्या लोंढे शेजारील चॅड या राष्ट्रात आश्रय घेत आहेत. दुर्देवाने तथाकथित आधुनिक जगाला या घडामोडींचा मागमूसही नाही. पुस्तकाचा लेखक स्वत: या सर्व परिस्थितीचा बळी ठरला आहे. त्याचे कुटुंबही या अत्याचारातून सुटलेले नाही. आपल्या इंग्रजीच्या ज्ञानामुळे त्याला ‘बीबीसी’, ‘एनबीसी’ या वृत्त वाहिन्या आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने पाठविलेल्या चौकशी दलांसाठी ‘दुभाष्या’ म्हणून काम करण्याची संधी मिळली. त्या संधीचा उपयोग करून डारफरमधील परिस्थिती या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने जगासमोर मांडली.
Reviews
There are no reviews yet.