Description
“’गुडबाय अर्थ’ हा बाळ फोंडके यांचा चौथा विज्ञानकथा संग्रह. बाळ फोंडके हे नाव आजच्या आघाडीच्या विज्ञानकथाकारांमध्ये घेतलं जातं, याचं कारण त्यांच्या कथांमधला आशय डॉ. फोंडके यांच्या कथा या विज्ञानाधिष्ठित असल्या तरी क्लिष्ट नसतात. त्यांच्या विज्ञानकथेला विनोदाचं वावडं नसतं हे तर सिद्ध करतातच पण विज्ञानकथांचं क्षेत्र हे फक्त अवकाशापुरतंच मर्यादित नाही, हेही डॉ. फोंडके यांच्या कथांतून आपल्याला जाणवत जातं. विषयांचं वैविध्य, त्याला दिलेली मानवतेची डूब आणि विज्ञानकथेत खरा नायक कोण असतो? तर ’परिस्थिती’ -सिच्युएशन; हेही त्यांची विज्ञानकथा सिद्ध करते. या संठाहातल्या कथा डॉ. फोंडके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाची खात्री पटवतातच पण दर्जाचीही खात्री पटवून देतात. निरंजन घाटे “
Reviews
There are no reviews yet.