Description
·
पुजेला लागणारे वडाचे झाड आपणांस घरातच लावता येईल काय? काही वर्षांपूर्वी ही कल्पना वेड्यासारखी वाटली असती; परंतु आता ते चिनी लोकांनी शोधलेल्या आणि जपानी लोकांनी वाढविलेल्या ‘बोन्साय’ने शक्य झाले आहे. याच कलेच्या माध्यमातून आपण निसर्गातील, जंगलातील विविध शैलींची झाडे घरातच ठेवू शकतो. ‘बोन्साय’ची कला आता भारतात रुजली आहे, वाढते आहे. या कलेपासून एक वेगळा आनंद मिळतो. आपणही तो आनंद घेऊ शकाल. ‘बोन्साय’ म्हणजे अनेक प्रयत्नांनी तयार केलेली झाडाची फक्त छोटी प्रतिकृती नव्हे, तर त्या झाडात त्याचे नैसर्गिक व मूळचे तेज दिसते. निसर्गापेक्षाही बोन्साय अधिक जातिवंत व नमुनेदार बनते. ‘बोन्साय’ची कला निसर्ग घरात आणते, मनाला आनंद देते. फावल्या वेळेत बोन्साय करा. घरातच निसर्ग निर्माण करा, त्याचा आनंद लुटा. त्यासाठी हे मार्गदर्शन.
Reviews
There are no reviews yet.