Description
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोनतीन दशकांमध्ये समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांसारख्या तत्त्वज्ञानांमुळे तसेच स्त्रीशिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती अशा घटनांमुळे भारतीय जीवनात मोठे स्थित्यंतर घडून आले. व्यक्तिजीवनावरील बंधने सैल झाली. रूढसमजुतींना व नीतिकल्पनांना तडे गेले; समाजातील सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर होऊ लागला. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली. समाजातील काहींनी या नव्या जीवनपद्धतीचा सहज स्वीकार केला, काहींनी आपल्याला सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या, तर उरलेले जुन्यालाच धरून राहिले. हिरवा चाफा ही कादंबरी प्रथम १९३८ साली प्रकाशित झाली. यामध्ये या नव्या काळातील आरंभीच्या बदलांचे चित्रण आहे. यातील क्रांतिकारी विचारांनी भारलेला मुकुंद किंवा ध्येयाने प्रेरित झालेली सुलभा हे नव्या पिढीचे, तात्यासाहेब जुने ते सोने मानणाNया पिढीचे, तर विजय पूर्णपणे नवे न स्वीकारलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत.
Reviews
There are no reviews yet.