Description
आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात जोवर आपण आपली भाषा, संस्कृती, साहित्य टिकवून धरू तोवरच आपले स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता सुरक्षित राहील. जागतिक स्तरावरील ज्ञानाचे संपादन हे आज आपल्या समग्र भाषा व साहित्य व्यवहाराचे उद्दिष्ट होऊ पाहत आहे. ते उद्दिष्ट साध्य करताना आपणापुढे भारतीय ज्ञान, साहित्य, संस्कृती, भाषा जपण्याचे व ते सारे समृद्ध करण्याचेही आव्हान आहे. अखिल भारतीय अकादमीक समाजनिर्मिती हे एकविसाव्या शतकातील आपले साहिाQत्यक लक्ष्य आहे. त्यासाठी भारतीय भाषा व साहित्याचे एकसमन्वायी, समेकित (CONSOLIDATE) रूप तयार करणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता प्रत्येकात भारतीय भाषा व साहित्याची समृद्ध जाण हवी. अशी जाण ‘भारतीय साहित्यिक’ हे पुस्तक तुमच्यात निर्माण करील. भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशात ‘भारतीय साहित्यिक’सारखं पुस्तक आपल्या संग्रही असणं म्हणजे भारतीयतेचं स्पंदन आपल्या हृदयाशी जपण्यासारखंच!
Reviews
There are no reviews yet.