Description
माझ्या दृष्टीनं — माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ – पवित्र ग्रंथाला कुरतडणारं. तो ल्यूसिफर होता. माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस. परंतु… या सर्वांहून अधिक भयंकर होतं – त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं — अल्लाजवळ पोचू शकणारा – आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.
Reviews
There are no reviews yet.