Description
सातोशी माचिता या जपानमधील जैवतंत्रज्ञान विषयामधील शास्त्रज्ञाची न्यू यॉर्कमधल्या एका सब वे प्लॅटफॉर्मवर बेमालूमपणे हत्या केली जाते. त्याने स्टेम सेल्सच्यासंबंधी लावलेला एक महत्त्वाचा शोध… जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटीत मिळालेली वाईट वागणूक… बेन कोरी या अमेरिकेतल्या एका कंपनीच्या सीईओने जपानमधील माफियांच्या मदतीने सातोशीला त्याच्या कुटुंबासकट अमेरिकेत आणून करार करणे… अशी सगळी पार्श्वभूमी आहे सातोशीच्या हत्येमागे…न्यू यॉर्कमधल्या ‘ओसीएमई’ या फॉरेन्सिक विभागात काम करत असलेली लॉरी माँटगोमेरी या हत्येचा तपास करायला लागते आणि सुरू होतो जीवघेणा संघर्ष. या संघर्षाचं थरारक चित्रण करणारी उत्कंठावर्धक कादंबरी आहे-क्युअर.
Reviews
There are no reviews yet.