Description
‘ज्ञानेश्वरांनी गायली गीता’, कारण त्यांच्या ‘पाठी पुण्याई उभी’ होती. अनेकांना नशिबाने ‘हिमालयाची सावली’ मिळते. ती असल्यावर ‘संसार हा सुखाचा’ होणारच, ‘कुंकू जपून ठेवावं’, पण ते ‘पद्मश्री धोंडीराजा’सारख्या व्यक्तीसाठी नाही. ‘सखाराम बार्इंडर’सारख्या माणसासाठी, तर नाहीच नाही. वय वाढलं तरी ‘म्हातारा न इतुका’ अशी माणसं असतात. कुणा पोराला विचारावं लागतं की, ‘पप्पा सांगा कुणाचे?’ जीवनप्रवासात भेटते एखादी ‘माता द्रौपदी’, एखादी ‘मीरा मधुरा’ भेटते, एखादा ‘भल्याकाका’, ‘धुक्यात हरवलेल्या वाटेवर’, ‘अशी पाखरे येती’ व ‘अंतरीच्या नाना कळा’ देऊन जातात. क्वचित ‘एखादी तरी स्मितरेषा’ उमटते. म्हणते, ‘शाब्बास, बिरबल शाब्बास!’ पण या सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरतो, तो ‘नटसम्राट’ आक्रंदतो, पोरका होतो, धावा करतो, घर हवं, मरण हवं; पण तेव्हा ‘यमाला डुलकी लागलेली’ असते.
Reviews
There are no reviews yet.