Description
‘‘द डायरी ऑफ अॅन प्रँÂक’’ हे जागतिक साहित्य-विश्वातील एक अमोल लेणे आहे. एका तेरा वर्षीय मुलीची ही अनुभव-गाथा वाचताना; डोळ्यांत टिपूसही येणार नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. दुस-या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा जो छळ झाला, त्यातील अघोरी अनुभव वाट्याला आलेली ही बालिका. आईवडील, बहिण आणि अन्य चार व्यक्ती नात्झी भस्मासुरापासून दूर पळत, एका इमारतीत लपून-छपून जीवन कंठू लागतात. पण दोन वर्षांतच त्यांना हुडवूÂन काढण्यात येते आणि जर्मन छळछावणीत सर्वांची रवानगी होते. कसेबसे वडील मात्र वाचतात. अॅनच्या मृत्युनंतर तिची डायरी वडिलांच्या हाती आली आणि १९४७ साली ती जेव्हा प्रसिद्ध झाली; तेव्हा तिचे वाङ्मयीन आगळेपण वाचकांच्या तात्काळ ध्यानात आले. महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल झाले होते, वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनेपायी इतरांचा अमानुष छळ करण्यासाठी मनुष्य कसा प्रवृत्त होतो, याचे प्रत्ययकारी चित्रण तर या डायरीत आहेच; पण एका उमलत्या कळीच्या भावभावनांना तिने आपल्या लेखनात यथेच्छ, कोणताही आडपडदा न ठेवता, वाट मोकळी करून दिली आहे. ‘‘मला मृत्युनंतरही जगायचे आहे, आणि म्हणून देवाने दिलेल्या या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे’’ असे तिने लिहिले. ही देवाची देणगी; म्हणजे तिच्यात वसणा-या सर्व भावभावनांना शब्दांत पकडण्याचे सामथ्र्य. गेल्या ४० वर्षांत या पुस्तकाच्या लाखो प्रति खपल्या!
Reviews
There are no reviews yet.