Description
रशियन राज्यक्रांतीच्या अतिशय अस्थिर अशा कालखंडात समाजातील सर्वच स्तरांतील व्यक्तींच्या जीवनात घडून आलेला दुःखद बदल या कादंबरीत एका विस्र्तीण कालपटलावर अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीनं रेखाटला आहे.नष्ट झालेलं व्यक्तिगत जीवन, देशाच्या नियतीशी अटळपणे बांधली गेलेली लोकांची आयुष्यं, उद्ध्वस्त झालेली स्वप्नं…. आणि युद्धाच्या आणि क्रांतीच्या छिन्नभिन्न वातावरणातही अकलंक राहिलेली प्रेमाची कोवळीक आणि जगण्याची अनिवार ओढ! ही कादंबरी म्हणजे एक विशाल जीवनप्रवाह आहे. माणसं येतात-जातात, युद्धं होतात, क्रांत्या होतात, देश निर्माण होतात, नष्ट होतात; पण जीवनाचा ओघ अखंड चालूच असतो. डॉक्टर आणि कवी असलेला युरी, त्याची पत्नी टोनिया आणि विलक्षण सुंदर प्रेयसी लारा या तिघांची ही कहाणी.
Reviews
There are no reviews yet.