Description
विज्ञान आणि त्याचं बोट धरून येणारं तंत्रज्ञान हे नैतिकही नसतं की अनैतिकही नसतं. ते ननैतिक असतं. या जगातला, माणसानं लावलेला पहिला शोध म्हणजे गरजेनुसार अग्नी प्रज्वलित करण्याचा. त्या अग्नीचा वापर आपलं अन्न शिजवण्यासाठी करता येतो किंवा सुनेला जाळण्यासाठीही करता येतो. त्यात अग्नीचा काय दोष? त्याचा वापर करणाया माणसाच्या स्वत:च्या भल्याबुयाचंच प्रतिबिंब त्या वापरात पडलेलं असतं. मग दृष्टिभ्रमाचा खेळ शक्य करणाया नजरबंदीचा किंवा मायादर्पणाचा वापरही त्या त्या व्यक्तींच्या भावविश्वाच्या बैठकीवरच अवलंबून असला, तर त्यात नवल ते काय!
Reviews
There are no reviews yet.