Description
जे तुम्हाला कधीच मिळणार नाही असं तुम्हाला वाटलं होतं, तेच तुम्हाला मिळालं तर? म्हणजे जसं आयुष्य तुम्हाला जगायचं असेल अगदी तसंच… अमेरिकेत राहणाऱ्या एका देखण्या भारतीय तरुणाशी प्रिया लग्न करते. ती दिल्लीतून लॉस एंजेलिसला जाते – हॉलिवूड आणि चित्रपट तारे तारकांमध्ये वावरते – आणि तरीही एकीकडे आज्ञाधारक हिंदू सुनेची भूमिका वठवते : स्वयंपाक, स्वच्छता, सासू सासऱ्यांच्या साऱ्या अपेक्षा पूर्ण करणं हे सारं करते. त्यामुळेच जेव्हा तिची सासू तिला नोकरी कर असं सुचवते, तेव्हा प्रियाला जरा आश्चर्यच वाटतं. अर्थात तिच्या पतीला आणि सासू सासऱ्यांना तिच्या नोकरीचं स्वरुप काय आहे ते कळलं असतं तर त्यांना जास्तच आश्चर्य वाटलं असतं. प्रिया एक लोकप्रिय, सर्वांना हवीशी, आणि सगळ्यांनी हेवा करावा अशी मनोरंजन वार्ताहर बनते आणि त्यांना हे कधीच मान्य होणारं नसतं. मजेशीर तरीही योग्य तिथे धारदार, अशी ही कादंबरी. कादंबरीची नायिका इतकी उत्कट, उत्साही आहे, की तुम्हालादेखील ती नक्कीच आवडेल.
Reviews
There are no reviews yet.