Description
९/११ च्या आदल्या रात्री एका वृद्धेचा अमानुषपणे खून का करण्यात आला? न्यूयॉर्कच्या एका यशस्वी बँकरला सकाळच्या डाकेनं बाईचा कापलेला डावा कान मिळूनही आश्चर्य कसं वाटलं नाही? एक सर्वोत्कृष्ट वकील फक्त एकाच अशिलासाठी काम करत होता अन् तेही पैसे न घेता? चोर नसतानाही एका व्यावसायिक तरुणीने व्हॅन्गॉगच्या अप्रतिम चित्राची चोरी का केली ? बँकेत कोणत्याही प्रकारचं खातं नसताना ऑलिम्पिक स्पर्धेत गाजलेल्या एका खेळाडू स्त्रीला प्रत्येक कामगिरीमागे दहा लक्ष डॉलर्सप्रमाणे पैसे का दिले गेले? वारसाहक्काने मुबलक मिळाले असतानाही एका तरुणीने सेक्रेटरीची नोकरी का पत्करावी? केवळ एकदा भेटलेल्या स्त्रीला पन्नास दशलक्ष डॉलर्स देण्यास स्टील उद्योगातील एका जपानी उद्योजकाला आनंद वाटणार होता, का बरं? या सर्व प्रश्नांची उकल होईल जेफ्री आर्चर यांच्या `फॉल्स इम्प्रेशन’ या नव्या पुस्तकात! मात्र, न्यूयॉर्क ते लंडन, लंडन ते बुखारेस्ट, टोकियो आणि अखेरीस इंग्लंडमधील एक सुस्त गाव असा श्वास रोखून धरणारा प्रवास केल्यानंतरच. मग सामोरं येईल व्हॅन्गॉगच्या `सेल्फ पोट्र्रेट वुईथ बॅण्डेज्ड इअर’ या चित्राचं खास रहस्य. धक्कादायक आणि अविस्मरणीय धाग्यांनी गुंफलेली विलक्षण अशी ही कादंबरी….
Reviews
There are no reviews yet.