Description
सध्याच्या वेगवान जगात ‘ई-मेल्स’, ‘सेलफोन्स’ अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे; पण एकेकाळी मुख्यत्वे ‘पत्रं’ या माध्यमातून संपर्क साधला जात असे. पत्रांतून कामांच्या तपशिलांखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे. शिवाय ही ‘पत्रं’ त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत. ‘पत्रं’ हा कायमस्वरूपी माहितीस्रोत असतो. या पुस्तकातली सुमारे ३०० पत्रं इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. ‘जे.आर.डी. टाटा’ या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली ही विविध विषयांना स्पर्श करणारी ‘पत्रं’ तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एका महान, बहुआयामी व्यक्तित्वाचं अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात.
Reviews
There are no reviews yet.