Description
जमील राहत असलेल्या तालसी प्रदेशात दोन महत्वाच्या, पण दुःखद घटना घडतात आणि सगळ्या गोष्टी बदलूनच जातात! मोठा भूकंप होऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्यामुळे मुख्य भूभागापासून तालसी तुटून वेगळ होत आणि त्याच रूपांतर एका बेटांमध्ये होत. त्यानंतर लगेचच, समुद्रात एक राक्षस असल्याच लक्षात येते आणि तो बेटवासीयांना त्रास देऊ लागतो, त्यांची अडवणूक करू लागतो. जमील आणि त्याच्या प्रत्येक मित्राच एकच स्वप्न असत – एके दिवशी या राक्षासाला चांगलाच धडा शिकवायचा आणि सगळ्या बेटवासीयांना भीती आणि असुरक्षितता यापासून मुक्त करायचा. जमील च आणखीही एक स्वप्न असत – हरवलेली सोन्याची किल्ली शोधण्याच! कारण या किल्लीमुळेच भविष्यात उद्दभावना-या नैसर्गिक आपत्तीपासून तालसी बेटवासीयांचा बचाव होणार असतो. साहसी योजना आखून समुद्र राक्षसाला तर जमील हरवतोच, पण त्यांच पुढचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक कठीण प्रसंगाला तोंड द्यावा लागत. त्यासाठी त्याला वाळवंट पार करावा लागतो. समुद्रचाच्यांना तोंड द्यावा लागत आणि भयंकर बिनराशीही सामना करावा लागतो. हि कथा आहे एका मुलाची मुलाची, त्याच्या स्वप्नाची आणि त्या साठी त्याने केलेल्या दिव्य साहसासाठी……
Reviews
There are no reviews yet.