Description
आपलं कुळ, गोत्र, पूर्वजांच्या सात पिढ्यांची नावं घडाघडा बोलून दाखवू शकणारा; पण ज्याचं स्वतःचं नाव कादंबरीत कुठेच येत नाही असा नायक. विचित्र परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे , स्वतःचं नसलेलं घर सोडून जातो. ‘अनाथ` शब्दाची चीड असलेला हा बारा-चौदा वर्षांचा मुलगा योगायोगानं नेमका अनाथालयाशीच जोडला जातो. मी ‘त्यांच्यातला` नाही हे स्वतःला आणि जगाला बजावत असतानाच नकळत ‘त्यांच्या` सुखदुःखांशी बांधला जातो. कुळ, वंश, जात या शब्दांचा अर्थ शोधतच मोठा होतो. केवळ शब्दातच अडकलेल्या अर्थाची निरर्थकता आणि साक्षात अनुभवातून सापडणारी जीवनाची सार्थकता यांचा वेध घेण्यात रमतो. त्याची आणि दहाव्या-बाराव्या वर्षीच त्या अनाथालयातल्या अवघ्या मुलांची आई झालेली दुर्गाई, तिची ती अनेक लहान मुलं…. तिथले कर्मचारी, संचालक, मार्गदर्शक, हितचिंतक, मुलांना दत्तक घेऊ इच्छिणारे भावी पालक यांची कहाणी…म्हणजेच ‘कर्णलोक.’
Reviews
There are no reviews yet.