Description
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी… रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत… या दरम्यानची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढनिश्चय, धाडस, चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवनयात्रेदरम्यानच्या आठवणी, भेटलेली माणसं, ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्या व्यक्ती, त्यांचे जिवलग, मार्गदर्शक, गुरू या सगळ्यांबद्दल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहीलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहे.
Reviews
There are no reviews yet.