Description
द नं. वन लेडीज डिटेक्टिव्ह एजन्सी या मालिकेतील हे तिसरं पुस्तक. मनाला भुरळ पाडणारी प्रेश्यस रामोत्स्वे सध्या घरी आणि व्यवसायामध्येही अडचणींना तोंड देतेय. तिच्या संस्थेला आर्थिक संकटानं घेरलंय. शेवटी तिनं एक मोठा निर्णय घेतलाय- आपले भावी पतिदेव श्री. जे. एल. बी मातेकोनी यांच्या मोटारदुरुस्ती गॅरेजच्या इमारतीत आपल्या ऑफिसचं बस्तान हलवायचं. त्यांच्या त्लॉक्वेंग रोड स्पीडी मोटर्स नावाच्या गॅरेजला तिच्या या निर्णयामुळे थोडाबहुत फायदा होणार आहे हे खरं असलं तरी आता परिस्थिती अशी उद्भवलीय की श्री. मातेकोनींनाच व्याQक्तश: तिच्या मदतीची गरज भासू लागलीय… या संकटाचा सामना करण्यासाठी ती मनाचं बळ एकवटतेय तेवढ्यात तिला तिच्या व्यवसायात एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागतंय- तिच्या काही अशिलांनी तिची मति गुंग करून टाकलीय; एका सरकारी अधिकाऱ्यांनी तिला स्पष्ट शब्दांत सांगितलंय, ‘माझी भावजयच माझ्या भावावर विषप्रयोग करतेय’; एका सौंदर्यस्पर्धेतील महिला उमेदवारांच्या देखण्या रुपड्यामागे दडलेल्या मनाचा निर्मळपणा तपासून पाहण्याची जोखीम तिच्यावर येऊन पडलीय; अचानकपणे काही लोकांना एका संपूर्ण नग्नावस्थेतील मुलाचा शोध लागलाय- त्याचं रानटी प्राण्यासारखं वागणं, त्याच्या अंगाला येणारा हिंस्त्र सिंहाचा वास…
Reviews
There are no reviews yet.