Description
आपले पाल्य यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये गणले जावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांच्या यशोगाथेची घोडदौड यशस्वी राहावी म्हणून पालकांची चढाओढ सुरू होते. ही चढाओढ पाहून काही विचार वाचकांसमोर मांडावेसे वाटतात. मुलांमध्ये आत्मविश्वास, कल्पकता, धडाडी नसेल, पुढाकार घेण्याची तयारी, निर्णय घेण्याची क्षमता नसेल, सुदृढ आरोग्य नसेल, तर मिळालेले मार्क कुचकामी ठरतात. परीक्षेत मिळालेल्या मार्कांचा यशस्वी व्यक्तिमत्त्वामध्ये फक्त पंधरा टक्के वाटा असतो. उरलेला पंच्याऐंशी टक्के वाटा दुर्लक्षित राहिलेला असतो व त्याची कसर कोणतेही क्लासेस भरून काढू शकत नाहीत. याच दुर्लक्षित बाबींकडे पालकांचं लक्ष वेधायचा प्रयत्न ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. यात मुलांच्या शालेय अभ्यासाविषयी तसेच अभ्यासाव्यतिरिक्त परंतु अभ्यासाला पूरक अशा गोष्टींची तपशीलवार चर्चा केलेली आहे. कारण याच गोष्टी बयाचवेळा दुर्लक्षित असतात. आपल्या पाल्याचा दृष्टिकोन कसा घडवायचा ह्याबद्दल बरेच पालक उदासीन असतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, यशस्वी व्यक्तिमत्त्वात ह्याचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक पालकाने जर ह्या गोष्टींची काळजी घेतली, तर पालक आणि पाल्य ह्यांमधील नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
Reviews
There are no reviews yet.