Description
जगभरात अफगाणिस्तानात सर्वांत जास्त ‘पॉपी’चे – अफूचे उत्पादन केले जाते. मुख्यत: अफूचा वापर नशा करण्यासाठी होतो. ऑस्ट्रेलियन पत्रकार ग्रेगॉर सेमन यांनी अफू या एकाच विषयाच्या मागे लागून प्रत्यक्ष अफगाणिस्तानात जाऊन जमवलेली माहिती, त्यांचे अनुभव व त्यांचा प्रवास या पुस्तकात कथन केला आहे. जगभरात फोफावणा-या दहशतवादामागे अफूचा पैसा कसा आहे, हे सेमन सखोल संशोधनातून आपल्यासमोर मांडतात. अफूच्या व्यवहारातून मिळणारा नफा कोणाला होतो आणि त्याची किंमत कोणाला मोजावी लागते, या प्रश्नाचा शोध घेताना सेमन यांना अफूच्या व्यवहाराशी निगडित शेतकरी, डॉक्टर, तस्कर, व्यसनाधीन माणसं, राजकारणी, पोलीस अशी विविध माणसं भेटतात. इतकंच नाही, तर इंग्रजी पॉप गाणी आवडणारा तालिबानी कमांडरही भेटतो! हा प्रवास एक वेगळेच जग आपल्या समोर उभे करतो, आपल्या कल्पनेपलीकडचे; पण वास्तववादी!
Reviews
There are no reviews yet.