Description
“मुंबईवरचा हल्ला ही केवळ एक झलक होती. यावेळी अतिरेक्यांनी प्रचंड मोठा कल्पनातीत आघात करून हिंदुस्थानचा सर्वनाशच करायचं ठरवलं होतं. एक कुठलातरी अर्धामुर्धा शब्दप्रयोग आयबीचा जॉइंट डायरेक्टर सिद्धार्थ राणा याच्या कानावर येतो `टू पाक..’ बऱ्याच खटपटीनंतर त्याला दोनच दिवस आधी हल्ल्याची तारीख कळते; पण स्थान, वेळ निसटून जात असतो. करोडो लोकांचं आयुष्य पणाला लागलेलं असतं. त्यातच सिद्धार्थला काही फितुरांशीदेखील सामना करावा लागतो. भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांवर आधारित, अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तडीला नेता येणारा महाभयंकर कट शिजलेला असतो. त्यात एका गूढ व्यक्तीची भर पडते आणि खेळ रंगत जातो. अतिशय गुंतागुंतीची, वेगवान घडामोडींनी भरलेली काल्पनिक कादंबरी उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचते आणि… “
Reviews
There are no reviews yet.