Description
१५७० साल. इटलीतील एक बेनेडिक्टीन मठ. त्या मठात जोगीण म्हणून इच्छेविरुद्ध डांबली गेलेली एक उच्चकुलीन, देखणी, तरुण, बंडखोर युवती. मठातून निसटून आपल्या प्रेमिकाशी विवाह करण्यासाठी तिनं लढवलेल्या हजार हिकमती आणि मठातील राजकारणामुळे तिच्या प्रयत्नांमध्ये आलेली विघ्न. पाकळीपाकळीनं उमलत उत्कंठा वाढवत नेणारं कथानक तुम्हाला सोळाव्या शतकातील इटलीच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक पाश्र्वभूमीचं यथार्थ दर्शन घडवून मंत्रमुग्ध करेल. देवतार्पण झालेल्या जोगिणींची ‘सेक्रेड हार्ट्स’– पवित्र अंत:करण– कशी राजनैतिक खेळी खेळतात ह्यात गुंगलेला वाचक कादंबरीच्या अनपेक्षित सुखान्त समारोपानं हर्षोत्फूल्ल होईल. वेगळ्या विषयावरील अनोखी कादंबरी!
Reviews
There are no reviews yet.