Description
एक कडवी संघटना आहे. टर्कीमधील रुइन या ऐतिहासिक शहराजवळच्या डोंगराळ भागात ती अत्यंत गुप्तपणे राहते आहे. त्या संघटनेच्या लोकांना सँक्टस असे संबोधले जाते. एका सँक्टस या संघटनेचा क्रूर चेहरा पाहिल्यानंतर तिथून निसटतो. या भूतलावरील सर्वांत जुन्या मानवी संस्कृतीच्या अधिष्ठानस्थळाच्या सर्वोच्च स्थानावरून स्वत:ला मृत्यूच्या खाईत झोकून देतो. प्रसारमाध्यमांच्या मेहेरबानीने ही घटना सगळं जग पाहतं. धर्मादाय संस्थेसाठी काम करणारी कॅथरीन मान आणि काही मोजक्या माहीतगार लोकांसाठी मात्र; ते प्रदीर्घ काळ ज्याची वाट पाहत होते, ती कृती करण्यासाठीचा हा संकेत असतो, तर कडव्या लोकांसाठी धोक्याचा इशारा. न्यू जर्सीमधल्या एका वृत्तपत्रासाठी गुन्हेगारी विश्वातल्या बातम्यांचा मागोवा घेणारी लिव्ह अॅडमसन हिच्यासाठी हीच घटना स्वत:च्याच एका नव्या ओळखीच्या मुळाशी पोहोचण्याच्या एका भयावह आणि धोकादायक प्रवासाची नांदी ठरते.
Reviews
There are no reviews yet.