Description
लग्न झालं तेव्हा प्राणेशाचार्य सोळा वर्षांचे, बायको भागीरथी बारा वर्षांची. तशी ती जन्मापासून आजारीच. पण संन्यस्त वृत्तीने जगावे ही लहानपणापासूनची खुमखुमी. किती सरळ, मायाळू, रूपवान, उंचापुरा, तेजस्वी माणूस; पण बिचा-याला स्त्रीसुख म्हणजे काय चीज आहे, याची कल्पनाही नाही. एकटाच झोपतो ओंडक्यासारखा. शरीर जर्जर झाल्यानंतर `काम` सोडून जातो; परंतु करुणा? आचार्यांना वाटलं `कामा`पेक्षा करुणा कितीतरी मोठी शक्ती. अशी करुणा आपल्यात नसती तर लग्नापासून अंथरूण धरलेल्या बायकोची अशी सेवा केली असती का? एखाद्या परस्त्रीच्या आहारी गेलो नसतो का?
Reviews
There are no reviews yet.