Description
समुद्र म्हटला की संघर्ष! जीवन-मरणाचा संघर्ष! असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणा-यांचा एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाला वेगळे धुमारे फुटतात. समुद्र म्हटला की साहस! प्राचीन काळापासून माणूस ते करीत आलेला आहे. …त्या तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर ही त्याच्या साम्राज्याचे केंद्र होते. त्याचा मालक हा कठोर होता. संपत्तीच्या जोरावर काहीही करणारा. त्याची दोनच मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी! संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांच्या साहाय्याने अॅलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.
Reviews
There are no reviews yet.