Description
ही कारागिरी खरी, पण ती जाणत्या अभ्यासकाने चिंतन-मननातून केलेली कारागिरी आहे आणि वहिनीसाहेबांचे सामथ्र्य केवळ कारागिरीचे नाही. ते कृष्णचरित्रात खोलवर अवगाहन केलेल्या भाविकाचे आहे आणि रसाळ अशा कथाकथकाचे-कवीचेही आहे. त्यामुळे हे श्रीकृष्णचरित्र म्हणजे केवळ भागवतातल्या श्रीकृष्णचरित्राचे मराठीकरण आणि सुलभीकरण नाही, तर ते एका स्वतंत्र, रसपूर्ण काव्याची प्रतिष्ठा पावले आहे. मूळ भागवतावर आधारलेले, भागवतातील तत्त्वज्ञानाची पक्की बैठक असलेले पण एक गोड, चित्ताकर्षक काव्य म्हणून हे चरित्र प्रशंसेला पात्र ठरणारे आहे.
Reviews
There are no reviews yet.